Tour Detail  
 
  Kolhapur Tour   RightClick to download  
     
 
 

करवीर नगरी (कोल्हापूर) सहल

दिनांक :- ९ ते १४ जानेवारी २०१

हिंदू धर्मशास्त्रानुसार, प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासुर हा इथे राज्य करत होता. याने राज्यात अनाचार व सर्वाना त्रस्त करून सोडले होते. म्हणून देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले. हे युद्ध नऊ दिवस चालले होते आणि अश्विन शुद्ध पंचमीस महालक्ष्मीने कोल्हासूर या राक्षसाचा वध केला. त्यावेळेस कोल्हासूर महालक्ष्मीला शरण गेला आणि त्याने तिच्याकडे आपल्या नगराची कोल्हापूर व करवीर ही नावे आहेत तशीच चालू ठेवावीत असा वर मागितला. त्याप्रमाणे या नगरीला कोल्हापूर वा करवीर या नावाने ओळखले जाते.

दिवस ला  -: मुंबई ते कोल्हापूर रात्रीचा ट्रेन प्रवास.

दिवस रा : - : कोल्हापूर दर्शन

धार्मिक ऐतिहासिक स्थळ दर्शन सहल- श्री महालक्ष्मी मंदिर , ज्योतिबा मंदिर , पन्हाळा किल्ला; तसेच "कोल्हापूर दर्शनाचा" संगीत - नृत्याचा रंगारंग कार्यक्रम .

दिवस रा:-  निसर्गरम्य "ग्रामंती" सहल, पळसंबे लेणी - शिवलिंग दर्शन , राधानगरी व्ह्यूव पॉईंट, धरण. दुपारी शेतकरी दादा सोबत शेतावरील गावरान जेवणाची मेजवानी. रात्री ४ स्टार हॉटेल मधील बार्बेक्यू डिनर पार्टी.

दिवस था : -अभयारण्य दर्शन - राधानगरी व दाजीपूर:-

हॉटेल मधून सकाळी निघून राधानगरी मध्ये न्याहारी. (६०किमी.) न्याहारी झाल्यानंतर राधानगरी - दाजीपूर जंगल जीप सफारी. रानगव्यांसाठी प्रसिद्ध असे क्षेत्र. दुपारच्या जेवणानंतर बॅकवॉटर व उगवाई - देवराई तसेच हत्ती महल येथे भेट.

दिवस वा:-  प्राचीन शिल्पस्तुती सहल:-

 कणेरी मठ, नरसोबा वाडी, कृष्ण प्रयागतिर्थ संगम घाट-कुरुंदवाड -कोटी तिर्थ ,तेथील परंपरागत "कलगीवाल्यांची" कला प्रदर्शनी, खिद्रापूर येथील प्राचीन मंदिर दर्शन (“कट्यार काळजात घुसली” सिनेमा मधील काही भाग ह्याच मंदिरात चित्रित झाला आहे) व सोबत ताजा उसाचा रसास्वाद. रात्री कोल्हापूर ते मुंबई ट्रेन प्रवास.

दिवस वा:-:मुंबईत सकाळी आगमन.

 
 

निवास :- ए. सी . डिलक्स रूम

जेवण :- उत्कृष्ठ शाकाहारी व मांसाहारी पद्धतीचे खमंग कोल्हापुरी जेवण. (तांबडा व पांढरा रस्सा सहित)

सहल खर्च प्रत्येकी १२,५००/- रुपये फक्त+ ट्रेन खर्च.

अधिक माहितीसाठी संपर्क: -

हिमश्री ट्रेक्स अँड टूर्स - श्री. देवेंद्र गंद्रे

मोबाइल :-९८६९११२८२७ / ९२२०८७४८४७

वेबसाइट : www.himashreetours.com

 
top
   
 
Copy Rights @ 2014 Himashree Treks & Tours Visitor Counter