Date :- 28 April 2019.
देवेंद्र सर ,
काल तुमच्या हिमश्री टूर्स बरोबर पराग मिल्क प्रॉडक्ट्स (गोवर्धन प्लँट )पाहण्याचा योग आला. कार्यक्रम छान झाला .
शिस्त बद्ध पणे वावरणारे गाईंचे समूह पाहताना एक वेगळा अनुभव आला .चीज प्लांट व त्याची प्रक्रिया अदभुत होती .उत्क्रुष्ट नियोजन , वातानुकूल बस , वेळोवेळी मिळणारा चहा , शीत पेय , चॉकलेट्स , उत्क्रुष्ट व चवदार जेवण , माझ्यासारख्या वॉकिंग स्टिक घेऊन चालणाऱ्या प्रवाशांची घेतली जाणारी विशेष काळजी , घरगुती वातावरण , आपुलकीने वागणारी यशश्री सारखी सहल संचालक ह्या सर्व गोष्टी आम्हाला विशेषत: जाणवल्या.
आमच्या साठी खऱ्या अर्थाने ही अभ्यास सहल होती .पुनः एकदा तुमचे आभार आणि तुमच्या पुढच्या सहली साठी शुभेच्छा.
-अनिल कालेकर , ज्योती कालेकर आणि श्रीमती लता कपोते .
|