DATE: 03 June 2019
भंडारदरा. ....हिमश्रीची एक नित्य यशस्वी सहल उपक्रम. ....खूप मजा आली, आम्ही सर्वांनी तूफान धमाल केली. रुपाली मॅडम, संदेश, यशश्री, अंकिता शिवाय भंडारदरा स्थानिक देवेंद्रनच्या मदतीला होते, सगळेच अफलातून. शिवाय आपला अंदमानचा ग्रुप आणि नवीन सोबती सगळेच प्रचंड उत्साही. भंडारदरा चा प्रवास एकदम सुंदर आहे, marching to कॅम्प, संध्याकाळचा चहा, गाणी, भेंड्या, ओळख, कॅम्प फायर, बार्बेक्यू, ग्रुप टेहळणी, रात्रीचे जेवण, काजवा महोत्सव, गप्पा गोष्टी यात रात्रीचे १२:३० १ केंव्हा वाजले ते कळले देखील नाही. ....
तेथील परिसर वेड लावण्यात इतका सुंदर आहे. तशीच तेथील माणस. पावसाळ्यात हा परिसर आणखी देखणा असतो असं अनेकांचं मत आहे. ....
सकाळी उठून सगळ्यांनी नदी-धरणबांध्यावर धाव घेतली. तेथेच सकाळचे चहा पोहे बिस्किटे खाल्ली, मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेतला. ....देवेंद्र सरांचा एक आवडता खेळ खेळून आम्ही अमृतेश्वरच दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. ....
परतीच्या प्रवासात कीर साहेबांची आणि वर्षाताईंच्या गाण्यांनी धमाल उडवून दिली, सर्वांनी त्यावर मनसोक्त नाचुन घेतलं. ....
अशी एक सुंदर सहल अनुभवायला मिळाली.
|